Ad will apear here
Next
सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमांत वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही परिचित आहे. आता तो प्रस्तुतकर्ता म्हणून पुढे येत आहे. आटपाडी नाइट्स या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे....
......
लोकमान्य, बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर असे चरित्रपट असो, की ‘तुला पाहते रे’मधील खलनायकी छटा असलेला विक्रांत सरंजामे किंवा ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये रंगमंचावर बिनधास्त वावर असलेला लाल्या असो, माध्यम कोणतेही असो सुबोध भावेने प्रत्येक व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अभिनेता म्हणून दमदार वाटचाल सुरू असताना त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि  कट्यार काळजात घुसली या अजरामर संगीत नाटकाला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याची कामगिरी उत्तम निभावली, तर  पुष्पक विमान या चित्रपटाचा निर्माता म्हणून पदार्पण करत एक वेगळा विषय प्रेक्षकांपुढे आणला. 

यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अजून एक शिखर सर करण्यास सुबोध भावे सज्ज झाला असून, प्रस्तुतकर्ता म्हणून ‘आटपाडी नाइट्स’ हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे. मायदेश मीडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केले असून, त्यांचा बडे अब्बू हा चित्रपट गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५०व्या ‘इफ्फी’मध्ये झळकला होता. ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आलेल्या ‘आटपाडी नाइट्स’ची कथा एका संवेदनशील विषयावर अतिशय वेगळ्या अंदाजात, खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते. 

याचा उत्कंठावर्धक टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये वसंत बापूसाहेब खाटमोडे (अभिनेता प्रणव रावराणे) हा युवक आपल्या मित्रांसोबत एका ज्योतिषाला आपला हात दाखवतोय, त्यावर तो ज्योतिष वसंताचा विवाह येत्या २० दिवसात होण्याचा बेत असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे अभिनेत्री सायली संजीवची एंट्री होते आणि ती प्रणवला आज बारीक दिसताय,म्हणते. यावर आपल्या प्रेमाचा माणूस आपल्याला हमेशा बारीकचं दिसतो,असं उत्तर तो देतो. तर पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे, हे ज्योतिषाचे वाक्य या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारे आहे. या चित्रपटाला विजय गावंडे, सिद्धार्थ धुकटे यांचे संगीत लाभले असून, नारायण पुरी, कमलेश कुलकर्णी यांची गीते आहेत. छायांकन नागराज दिवाकर, वीरधवल पाटील यांनी केले आहे. वेशभूषा नामदेव वाघमारे, रंगभूषा  महेश बाराटे यांची आहे, तर संदीप इनामके कलादिग्दर्शक असून नीलेश गावंड यांनी संकलन केले आहे.

दरम्यान, ‘आटपाडी नाइट्स’च्या टीजरबरोबरच पहिल्या पोस्टरचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. या पोस्टरमध्ये एक सुंदर सजावट केलेले हिरव्या रंगाचे बंद दार आहे, दाराच्या मध्यभागी शुभविवाह लिहिलेले आहे, तसेच दारावर ‘डू नॉट डिस्टर्ब’चा टॅग लावलेला आहे. यामुळे या बंद दाराआड नेमकी काय कथा दडली आहे? या प्रश्नाचे उत्तर येत्या २७ डिसेंबर रोजी मिळणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZLLCH
Similar Posts
ईशा ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या रंगमंचावर तुम्हाला ‘तुला पाहते रे’ ही मालिका आठवते का ? त्यातील ती गोड मुलगी जिने अतिशय जिद्दीने सर्व संकटाना तोंड देत विक्रांत सरंजामेवर मात केली. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-ईशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं होतं. त्यातली ईशा निमकर म्हणजेच सगळ्यांची आवडती अभिनेत्री गायत्री दातार. ही गोड अभिनेत्री
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language